Marathi Motivational Story, साधूंची गोष्ट तुमचं जीवन बदलवुन टाकेल. Motivational Story in Marathi

एका साधूंची ही गोष्ट तुमचं जिवण बदलुन टाकेल,तुमचां निर्णय जिवनात कधीच चुकणार नाही फक्त ही गोष्ट पुर्ण बघा.

एका गावात एक साधू राहत होते. ते खुप बुद्धिवान होते. ते त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञानाने गावातील लोकांची मदत करायचे. जेव्हा गावातील राजाला त्या साधू विषयी समजलें की ते खूप न्याणी असुन गावातील लोकांची मदत करतात, तेव्हा राजा त्या साधूला जाऊन भेटले आणि म्हणाले की या झाडाखाली राहुन तुमचं जीवन वाया नका घालवु, तुम्ही माझ्या सोबत राजवाड्यात चला आणि मी तुम्हाला राज्याचा मंत्री बनवतो, मग मंत्री बनुन संपुर्ण गावाची मदत करा.

साधू राजांचे आमंत्रण स्वीकार करतात परंतु, काही अट राजासमोर मांडतात.

साधू राजांला बोलतात की मला तुमच्या राजवाड्यात अशी एक खोली पाहिजे की तिथे माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही जाणार नाही. आणि त्या खोलीची चावी नेहमी माझ्याजवळ राहिलं. आणि तुम्ही मला कधीच विचारायचं नाही की, मी त्या खोलीत जाऊन काय करतो. जर तुम्ही मला खोलीचया विषावर प्रश्न केला की तर मी इथुन निघून जाईल.

राजा म्हणाले ठीक आहे मला काही अडचण नाही, तुम्हाला एक वेगळी खोली दिली जाईल.

प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या मुद्यावर चर्चा व्हायची, आणि ते कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एकवेळेस त्या खोलीत जायचे आणि एक तासाने येऊन त्यांचा निर्णय राजांना सांगायचे. आणि त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य असायचा.

हा क्रम एक वर्ष चालु राहिला, शेवटी राज्यातील प्रत्येक व्यक्तीचया मनात एकच विचार की साधू खोलीत जाऊन काय करतात. कोणी म्हणायचे साधुन काळा जादु येत असेल, नाहीतर कोणाला मध्ये कोंडून ठेवलं असेल, अशा प्रकारच्या अफवा पसरू लागल्या. गावातील लोक राजाला सांगु लागले की तुम्हाला त्या खोलीत जाऊन बघायला पाहिजे की त्यात काय आहे.

राजा त्या साधुजवल जाऊन त्यांना बोलतात की मला तुमची खोली बघायची आहे. साधू राजांला म्हणाले की तुम्हाला तुमचं वचन आठवण आहे ना,मी राजमहाल सोडुन निघून जाईल, बघुन घ्या खोली. राजांना त्या साधुला हरवायच नव्हतं म्हणुन राजाने साधुची माफी मागितली.

परंतु राजाला पण बघायचं होत की त्या खोलीत काय आहे. एक दिवस राजाने तो दरवाजा तोडून टाकला. आणि मध्ये जावून बघितल तर खोलीत त्यांना काहीच नाहि मिळाले. फक्त भिंतीला जुने कपडे टांगलेले होतें आणि एक भिक्षा मागायचा कटोरा होता. तितक्यात साधू खोलीत आले आणि राजाला म्हणाले की या खोलीत काहीच नाही आहे. इथे फक्त माझे जुने कपडे आहेत मी कुठलाही निर्णय घेण्या अगोदर माझे जुने कपडे परिधान करतो. आणि हातात भिक्षेची कटोरी घेऊन बसतो. त्यानंतरच मी योग्य निर्णय घेऊ शकतो. मंत्री बनुन आणि हिरे मोती , उत्तम वस्त्र परिधान करून मी योग्य निर्णय घेऊ शकतं नाही. कारण माझी सत्यता एक भीक्षुकाची आहे, मंत्री ची नाही.

ही छोठयाष्या गोष्टीतून आपल्याला एक शिकायला मिळते. जर तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या जीवनाची सत्यता स्वीकारून निर्णय घ्या. विश्वास ठेवा की तुम्ही जिवनात योग्य निर्णय घेणे शिकुन जाल. जे तुम्ही नाही,आहे, स्वतःला ते समजुन कधीच निर्णय घेऊ नका नाहीतर तुमचा निर्णय चुकीचा ठरु शकतो.

मित्रानो गोष्ट आवडली असेल तर लाईक कमेंट करून मला नक्की कळवा, या पेजवर मिळणारा प्रत्येक लेख जिवनात एक नविन धळा शिकवेल. आमच्या पेजवर प्रेरणादायी मराठी सुविचार, महान विचारवंताचे विचार, प्रेरनादायी गोष्टी, कविता इ. विषयांवर आधारित माहिती दिली जाते.जर तुम्हाला नियमीत अश्याच प्रकारचे लेख हवे असतील तर आताच आमच्या राष्ट्रिय मराठी या पेजला फॉलो करा.

                 

                     धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हनुमान चालीसा मराठी अर्थासाहित.

Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore

खुप झाल देवा आता, काहीतरी चमत्कार कर...