हनुमान चालीसा मराठी अर्थासाहित.

*पवनपुत्र हनुमान यांना कलियुगातील प्रमुख देवांमध्ये गणले जाते. रामायणातील सुंदर कांड, आणि हनुमान चालीसा मध्ये त्यांच्या चरित्राचे वर्णन केले आहे. यांच्या अनुसार हनुमान हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणदायी आहे. आज तुम्हाला हनुमान चालीसा मराठी आर्थासहित सांगणार आहे. हे हनुमान चालीसा एकुण प्रत्येकाचे कष्ट दूर होण्यास मदत होईल.


*हनुमान चालीसा कवी तुलसीदास यांनी लिहिली असून, 

 *पहिल्या १० स्तोत्रात त्यांची शक्ती व ज्ञानांचे वर्णन आहे. 11 ते 20 या स्तोत्रामध्ये प्रभु रामा बद्दल सांगितले गेले आहे., ज्यामध्ये 11 ते 15 मधील स्तोत्रं रामचे भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे. बाकीच्या स्तोत्रात तुलसीदासानी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितले आहेत.

*चला तर मग संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत बघु.

"श्री गुरु चरण सरोज रज,

 निज मन मुकुरु सुधारि।

 बरनऊं रघुवर बिमल जसु,जो दायकु फल                                              चारि।

अर्थ-श्री गुरू यांच्या चरण कमलाच्या धुळीने, आपले मन रुपी दर्पण,पवित्र करून श्री राम यांचे निर्मळ यशाचे वर्णन करीत आहे.जे चारही प्रकारचे फळ म्हणजे धर्म, अर्थ,काम आणि मोक्ष देणारे आहे.


" बुद्धिहीन तनु जानिके,

 सुमिरो पवन-कुमार।

 बल बुद्धि विद्या देहु मोहिं, 

 हरहु कलेश विकार।

अर्थ - हे पवनकुमार मी आपले स्मरण करीत आहे. माझे शरीर आणि बुध्दी दोन्हीही अशक्त आहे. कृपा करून मला बळ, बुध्दी आणि न्यान देऊन माझे सर्व दुःख, दोष, क्लेश यांचा नाश करा.


* जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुं लोक उजागर॥1॥

अर्थ-श्री हनुमानजी तुमचा जयजयकार असो. आपण गुण आणि न्यानाचे सागर आहात. हे कपिश्र्वर, आपला जयजयकार असो, तिनंही लोकात म्हणजे स्वर्ग लोकं,भुलोक, पातळ लोकात आपली किर्ती आहे.

"राम दूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा॥2॥

अर्थ-हे पवनसुत अजनी नंदन तुमच्या सारखा दुसरा कोणीच बलवान नाही.


"महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी॥3॥

अर्थ-हे महविर विक्रम बजरंग बली, तूम्ही विशेष पराक्रमी आहात. तुम्ही दुर्बुधीचा नाश करतात, आणि सद्बुद्धी ठेवणाऱ्या व्यक्ती सोबत असतात.


"कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुण्डल कुंचित केसा॥4॥

अर्थ-आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल, आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात.


"हाथबज्र और ध्वजा विराजे,कांधे मूंज जनेऊ साजै॥5॥

अर्थ-आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे. खांद्यावर मुंज जनऊ ची शोभा आहे.


"शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महा जग वंदन॥6॥

अर्थ-हे भगवान शकरचे अवतार , हे केशरी नंदन अपल्या पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे.


 "विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर॥7॥

अर्थ-आपण प्रचंड विद्यावन, गुणवान, अत्यंत कार्य कुशल असुन श्रीरामाचे कार्य करण्यास आतुर असतात.


"प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया॥8॥

अर्थ-आपल्याला श्री रामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्री राम, सीता आणि लक्ष्मण तुमचय रुदयात वास करतात.


"सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा, बिकट रूप धरि लंक जरावा॥9॥

अर्थ-आपण अती सुष्म रुप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रुप धारण करुन लकेचे दहन केले.


"भीम रूप धरि असुर संहारे, रामचन्द्र के काज संवारे॥10॥

अर्थ-आपण भिमकाय रुप धारण करून राक्षसांचा नाश केला. आणि श्री रामाचे उद्दिष्ट यशस्वी केले.


"लाय सजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरषि उर लाये॥11॥

अर्थ-तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मनाला जीवनदान दिले. त्यामुळे प्रभु श्रीरामानी आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले.


"रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई॥12॥

अर्थ-श्री रामचंद्र यांनी तुमची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही भरतासारखे माझे प्रिय भाऊ आहात.


"सहस बदन तुम्हरो जस गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥13॥

अर्थ-श्री राम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखानी उल्लेखनीय आहे.


"सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद, सारद सहित अहीसा॥14॥

अर्थ-श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार, मुनी ब्रम्हा, नारद मुनी, शेषनाग , सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात.


"जम कुबेर दिगपाल जहां ते, कबि कोबिद कहि सके कहां ते॥15॥

अर्थ-यमराज, कुबेर इ. सर्व दिशांचे रक्षक, कवी विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही.


"तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा॥16॥

अर्थ-तुम्ही सुग्रीव आणि श्री राम यांची भेट करुन सुग्रीव जिनवर उपकार केले. सुग्रीव वाला राजपद मिळउन दिले.


"तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेस्वर भए सब जग जाना॥17॥

अर्थ-बिभीषण जिनी आपल्या उपदेशाचे पालन केले. त्यामुळे ते लंकेचे राजा बनले.हे सर्व जगाला माहित आहे.


"जुग सहस्त्र जोजन पर भानू, लील्यो ताहि मधुर फल जानू॥18॥

अर्थ-जो सुर्य इतक्या योजन लांब आहे, की त्याच्याजवळ पोहचायला हजारो युग लागतील. दोन हजार योजन लाबिवर असलेल्या सूर्याला तूम्ही एक गोड फळं समजून गिळून घेतल.


"प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि, जलधि लांघि गये अचरज नाहीं॥19॥

अर्थ-तुम्ही श्री रामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाहि.


"दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥20॥

अर्थ-या जगात जितके काठीनाहून कठीण काम आहे,ते तुमच्या कृपेने सहज होतात.

"राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसा रे॥21॥

अर्थ-तुम्ही श्री रामचंद्रजींच्या दरवाज्याचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही, म्हणजेच राम कृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. म्हणजेच तुमच्या प्रशांशेशिवाय श्री राम कृपा दुर्लभ आहे


"सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना ॥22॥

अर्थ-जो तुम्हाला शरण येतो,त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तूम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही


"आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हांक तें कांपै॥23॥

अर्थ-तुमच्याशिवाय, तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही,

तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकांत थरकाप होतो.


"भूत पिशाच निकट नहिं आवै, महावीर जब नाम सुनावै॥24॥

अर्थ-जेथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते, तेथे भूत पिशाच जवळपासही भटकत नाही


"नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा ॥25॥

अर्थ-वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात,आणि सर्व त्रास नष्ट होतात.


"संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै॥26॥

अर्थ-हे हनुमान, विचारात, कृती करण्यात, बोलण्यात ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते, त्यांना सर्व संकटापासून तुम्ही सोडवतात.


"सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा॥27॥

अर्थ-तपस्वी राजा श्री राम चन्द्र जी सर्वात श्रेष्ठ आहेत, तूम्ही त्यांची सर्व कामे सहज केले.


"और मनोरथ जो कोइ लावै, सोई अमित जीवन फल पावै॥28॥

अर्थ-ज्याच्यावर तुमची कृपा आहे, त्यानें कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळं मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही.


"चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा॥29॥

अर्थ-आपली किर्ती चारही युगात, सत्युग, त्रेतायुग, द्वापार, कली युगात पसरली आहे. आपली किर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे.


"साधु सन्त के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे॥30॥

अर्थ-हे श्री रामाचे प्रिय, तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांच्या नाश करतात.


"अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, अस बर दीन जानकी माता॥31॥

अर्थ-तुम्हाला श्री जानकी माते कडून असा वरदान भेटला आहे, ज्याद्वारे तूम्ही कोणालाही आठ सिद्दी आणि नऊ निधी देऊ शकता.


"राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपति के दासा॥32॥

अर्थ-तुम्ही निरंतर रघुनाथांच्या आश्रयमध्ये राहतात. म्हणुन तुम्हाला म्हातारपण आणि असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषधी आहे.


"तुम्हरे भजन राम को पावै, जनम जनम के दुख बिसरावै॥33॥

अर्थ-तुमची पूजा केल्याने श्री रामचद्रांनी प्राप्ती होते,आणि जन्म- जन्मांतराचे दुःख दूर होते.


"अन्त काल रघुबर पुर जाई, जहां जन्म हरि भक्त कहाई॥34॥

अर्थ-अंत काळी श्री रघुनाथ धामाला जतात. आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील, रामभक्त म्हणुन ओळखले जातील.


"और देवता चित न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई॥35॥

अर्थ-हे हनुमान, तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात. मग दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही.


"संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा॥36॥

अर्थ-हे वीर हनुमान,जो तुमचे एकत राहतो,त्याची सर्व सकटे दूर होतात.आणि सर्व त्रास नाहीसे होतात.


"जय जय जय हनुमान गोसाईं, कृपा करहु गुरु देव की नाई॥37॥

अर्थ-हे हनुमान स्वामी, तुमचा जयजयकार असो. जय हो, जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा.


"जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बंदि महा सुख होई॥38॥

अर्थ-जो कोणी या हनुमान चालीसा चे शंभर वेळा पठण करेल,तो सर्व बंधनातून मुक्त होईल, आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल.


"जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा॥39॥

अर्थ-भगवान शंकरांनी हे हनुमान चालीसा लिहून घेतली,म्हणून ते साक्षी आहे,की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल.


 "तुलसीदास सदा हरि चेरा, कीजै नाथ हृदय मंह डेरा॥40॥

अर्थ-हे नाथ, हनुमान जी, तुलसीदास सदैव श्री रामाचा सेवक आहे. म्हनुन तुम्ही त्याच्य हृदयात निवास करा.




"पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सूरभूप॥

अर्थ-हे सकट मोचान पावन कुमार, आपण आनंद मंगळाची प्रतिमा आहे,हे देवराज, तूम्ही श्री राम, सीता आणि लक्ष्मण सहित माझ्या ह्रदयात निवास करा.


तर मित्रांनो आपण संपूर्ण हनुमान चालीसा मराठी अर्थासहित बघितली. काही कमी असेल तर कमेंट करा. तुम्हाला हा लेख वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि अश्याच प्रकारचे नविन लेख बघण्यासाठि राष्ट्रिय मराठी ब्लॉगला फॉलो करा.

                                  

                                                  धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore

खुप झाल देवा आता, काहीतरी चमत्कार कर...