Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore

*जन गण मन अधिनायक जय है,भारत भाग्य विधाता, या देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रगीताचे लेखक आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. 

त्यांच्या अद्भुत साहित्यकृतीमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. रवींद्रनाथ टागोर हे असे साहित्यिक आहेत ज्यानी फक्त भारताचेच राष्ट्रगीत नाही ,तर बांगलादेशाचे "आमार सोनार बांग्ला" हे राष्ट्रीय गीत देखील रवींद्रनाथ टागोर यांच्या अष्टपैलुपणाने रचले आहे.


यावरून हे समजले जाऊ शकते की महात्मा गांधीजींनी त्यांना "गुरुदेव" या पदवीने संबोधित केले.आणि सन 1913 मध्ये त्यांची साहित्यिक कविता गीतांजली मुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले.अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर हे साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले नागरिकही आहेत.

तर मग आपण सर्वांनी 7 मे 1861 रोजी जन्मलेल्या या महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोरांचे अनमोल विचार जाणून घेऊ,ज्यापासून आपण सर्वजण प्रेरणा घेऊन देशभक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो.



"आनंदी राहणे खूप सोपे आहे, परंतु सोपे असणे खूप कठीण आहे."


"केवळ युक्तिवाद करणारे मन फक्त ब्लेड असलेल्या चाकूसारखे आहे. जो त्याचा वापर करतो त्यालाच दुखापत होते."


"फुलांच्या पाकळ्या तोडून तुम्ही त्याचे सौंदर्य गोळा करत नाही."


"मृत्यू प्रकाश संपवण्यासाठी नाही तर पहाटेच्या वेळी दिवा विझवण्यापुरतीच आहे." -


"मैत्रीची खोली परिचयांच्या लांबीवर अवलंबून नाही." 


"प्रत्येक मूल हा संदेश घेऊन येतो की देव अद्याप मनुष्यापासून निराश झाला नाही."

"जे काही आपले आहे ते आपल्यापर्यंत तेव्हाच पोहोचते जेव्हा आपण त्याला ग्रहण करण्याची क्षमता विकसित करतो."

"विश्वास हा असा पक्षी आहे. की ज्याला अगदी पहाटेच्या अंधारातही प्रकाश जाणवतो."


"जे लोक चांगले करण्यास खूप व्यस्त आहेत,ते स्वत:ला चांगले होण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत."


“कलाकार हा निसर्गाचा प्रियकर आहे, म्हणून तो त्याचा शिष्यही आणि गुरुही आहे."


"मी स्वप्न पाहिले की जीवन आनंद आहे. मी जागृत झालो आणि मला आढळले की जीवन सेवा आहे. मी सेवा केली आणि मला आढळले की सेवेतच आनंद आहे."


"जर आपण सर्व चुकांची दारे बंद केली तर सत्य बाहेर राहुन जाईल."


"कलेच्या माध्यमाने व्यक्ती स्वतःला उजागर करतो, त्याच्या वस्तूला नव्हे."


"आपल्यावर अडचणी येऊ नयेत म्हणून आपण प्रार्थना करु नये, परंतु आपण निर्भयपणे त्यांचा सामना करू अशी प्रार्थना करूया."


"प्रेम हक्कांचा दावा करत नाही, परंतु स्वातंत्र्य प्रदान करतो."


"प्रेम हे एकमेव वास्तव आहे, प्रेम फक्त भावना नसून सृष्टीच्या काळापासून हृदयात वास करणारे हे एक परिपूर्ण सत्य आहे."


"चंद्र आकाशात आपला प्रकाश पसरवतो परंतु आपला कलंक स्वतःजवळ ठेवतो."


Also Read-

साधूंची गोष्ट तुमचं जीवन बदलवुन टाकेल.

कोरोना व्हायरस ला घाबरत आहात, तर हा लेख तुमच्याच साठी आहे.



"संगीत दोन आत्म्यांमधील अंतर भरते."


"जेव्हा मी स्वत:वर हसतो ,तेव्हा माझ्या डोक्यावरचा भार कमी होतो."


"सर्वोच्च शिक्षण तेच आहे जे आपल्याला केवळ माहितीच देत नाही तर आपले आयुष्य सर्व अस्तित्वाशी सुसंगत करते."


"पात्रातील पाणी नेहमीच चमकत असते आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद रंगाचे असते. छोट्या सत्याचे शब्द नेहमीच स्पष्ट असतात, महान सत्य मौन राहते."


"जेव्हा आपण नम्रतेत महान होतो तेव्हा आपण महानतेच्या अगदी जवळ येतो."


"आपण स्वातंत्र्य तेंव्हा प्राप्त करतो."जेव्हा आपण त्याची संपूर्ण किंमत मोजतो."


"फक्त उभे राहून पाणी पाहून आपण समुद्र पार करू शकत नाही."


"वस्तुस्थिती बरीच आहे, परंतु सत्य एकच आहे."


"फुले गोळा करन्यासाठी थांबुन जाऊ नका. पुढे चालत जा, तुमच्या मार्गावर फुले निरंतर उमलत राहतील."


"देव महान साम्राज्याला कंटाळून जातो,पण लहान फुलाना कधीच कंटाळत नाहीत.:


"जो मनातील दु:ख स्पष्टपणे सांगू शकत नाही, त्यांना खूप राग येतो."


"ज्याप्रमाणे घरटे झोपी जाणाऱ्या पक्ष्याला आश्रय देते,त्याच प्रकारे मौन आपल्या बोलण्याला आश्रय देते."


"उपदेश करणे सोपे आहे,पण समाधान सांगणे कठीण."


"सौंदर्य सत्याचे स्मित हास्य आहे.जेव्हा सत्य स्वतःचा चेहरा एका उत्तम आरशात बघतो."


"फुलपाखरू महिने नाही,क्षण मोजते.आणि त्याच्याकडे पुरेसा वेळ असतो."


"धुळ स्वयं अपमान सहन करते.आणि त्या बदल्यात फुलांचा उपहार देते."


"विद्यापीठे महापुरुष तयार करनारे कारखाने आहेत.आणि शिक्षक त्यांना बनविणारे कारागीर.

    "


    "काहीतरी करत बसणे यालाच कर्तव्य म्हणू शकत नाही,काही काळ असा पण असतो की तेंव्हा काहीही न करणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले जाते."


    "तो माणूस खूप भाग्यवान आहे ज्याची प्रसिद्धी त्याच्या सत्यतेपेक्षा जास्त प्रकाशमान नाही."


    "ती प्रत्येक समस्या जीच्यापासून आपण लांब पडतो. ती समस्या स्वप्न बनुन तुमच्या झोपेत बाधा आणेल."


    "जर आपल्या अंतःकरणात प्रेम जागृत नसेल तर, तर जग आपल्यासाठी कारागृह आहे."


    "सर्वात चांगला बदला म्हणजे क्षमा करने."


    "मातीपासून मुक्त होने,झाडांसाठी स्वतंत्रता नसते."


    "मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे."


    "फुल भलेही एकटे असले तरी ते काट्याशी ईर्षा करत नाही."


    "मुर्ती तुटून धुळात मिसळणे हे दर्शविते की देवाची धूळ आपल्या मूर्तीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे."


    "जेव्हा आपण जगावर प्रेम करतो तेव्हाच आपण जगात जगतो."

    "मुलाचे शिक्षण केवळ आपल्या वेळेपर्यंतच ठेवू नका कारण त्याचा जन्म आणि आपल्या जन्मामध्ये बरेच फरक आहे."

    "ही झाडे पृथ्वीहुन स्वर्गात संवाद साधण्याचे माध्यम आहेत."


    "जर प्रेमाच्या स्वप्नानंतरही आपली झोप उघडत नसेल तर आपल्या आयुश्यावर धिक्कार आहे."


    "पानांनी झाकलेल्या झाडामध्ये फळ फारच क्वचित आढळतात."


    "जीवन आपल्याला देवाद्वारे मिळाले आहे, ज्याच्या मध्यामातून आपण कमावतो."

      

    मित्रानो गुरुदेव रविंद्नाथ टागोरांचे हे विचार आपल्याला जिवनात नक्कीच उपयोगात येतील. त्यामुळे आपले जीवन अधिक परिपक्व होण्यास मदत होईल. तर तुम्हाला हे विचार कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि अश्याच प्रकारचे नविन पोस्ट पाहण्यासाठी राष्ट्रीय मराठी या फॉलो करा.


                                                     धन्यवाद.

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    हनुमान चालीसा मराठी अर्थासाहित.

    खुप झाल देवा आता, काहीतरी चमत्कार कर...