Positive thinking in marathi,कोरोनाचि भिति मनातुन निघुन जाईल.
*कोरोना व्हायरस ला घाबरत आहात, तर हा लेख तुमच्याच साठी आहे. हा लेख वाचल्यानंतर नंतर 99% चांस आहेत की तुम्ही स्वस्थ राहाल. फक्त लेख शेवटपर्यंत बघा.
*एक आठवळया अगोदर एका मित्राने त्याच्या मित्राला कॉल केला,की तो मुंबईला एका दवाखान्यात त्याच्या वडिलांसोबत आहे. थोडा वेळ फोन वर बोलणं झाल त्यानें त्याला दवाखान्यातील परिस्तिथी, तिथल्या वातावरणा बद्दल सांगितले. तिथे काय हालचाल आहे, कसे उपचार होताय. पेशंटला कश्या पद्धतीने त्रास होतोय. एक घंटा फोन वर त्याचे बोलणे चालु होते.फोन ठेवल्यानंतर त्याच्या मित्राच्या गोष्टी एकूण त्याला श्वास घ्यायला अडचण येऊ लागली. फोन वर बोलांयच्या अगोदर तो स्वस्थ होता, परंतु फोनवर जे बोलण झाल त्यामुळे त्याचे शरीर लगेच अस्वस्थ होऊ लागले. त्याला आजारी असल्यासारखे वाटू लागले.
तो प्रत्येक रात्री झोपताना सकारात्मक विचार करून झोपायचा, परंतु त्यारात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नाही.
मित्रांनो ,शेवटी त्या व्यक्तीला श्वास घ्यायला अडचण का येऊं लागली. त्याला तर काही व्हायरस झाला नव्हता,
तर मित्रांनो आपण जेंव्हा आपल्या शरीराला, मेंदुला एखाद्या आजाराविषयी अधिक माहिती देतो किंवा त्या आजाराबद्दल नकारात्मक गोष्टी एकतो किवा बोलतो त्यावेळेस आपल्या शरीरात असलेले सेल्स त्या मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक्रिया करतात. आणि आज देशभरात जे भितिचे वातावरण आहे, त्या सर्वांना जबाबदार आपण आहोत.
समजा तुमच्या पायामधे एक काटा रुतला, आणि शेकडो लोकं येऊन तुम्हाला म्हणाले, किंवा त्यांनी तुम्हाला घाबरून दिलं,की आता तुमचा पाय ठीक होणार नाही.हे सर्वात घातक आहे. तर तुमचं अवचेतन मन या गोष्टीना ग्रहण करून घेईल. आणि अस पण होऊ शकतं की त्या छोट्याश्या काट्याने तुमचा जीव सुध्दा जाऊ शकतो.
दुसरीकडे जर तुम्हाला एखादा भयंकर आजार झाला असेल आणि हजार लोकांनी तुम्हाला सांगितलं की चिंता करायची नाही, हा साधारण आजार आहे. तर 99% संभावना आहे की तुम्ही बरे व्हाल.
आपले विचारच त्या आजारांवर आपला कितपत विश्वास आहे यावर आपले शरीर प्रतिक्रिया करत असते, की या आजाराला बरे करायचं आहे की, वाढवायचं आहे. आज आपल्या देशात पसरलेल्या व्हायरसला आपणच मजबुत केलंय. जर त्या व्हायरस मध्ये १% ताकत होती तर आपण भीतीचे वातावरण तयार करून त्याला १०००% ताकद दिली.
आता आपण सर्वांनी व्हायरस संबधी असलेली नकारात्मक भूमिका दूर केली पाहिजे, जे नकारात्मक माहिती असेल त्याला एकू नये व तिचा प्रसार करू नये. नाहीतर या नकारात्मक गोष्टी एकुण तुम्ही एक प्रकारे आजाराला निमंत्रण द्याल. विचार करा जर त्या व्यक्तिला फक्त एक फोन कॉल मुळे श्वास घ्यायला अडचण येऊ लागली तर जे 24 तास याच नकारात्मक मानसिकतेत राहतात. त्यांना तर घर बसल्या आजारपण येईल.
त्यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळा,बाहेर कामानिमित्त जावेच लागले तर स्वतःची सुरक्षा व्यवस्तिथ करून जा. आणि नकारात्मक लोकांपासून लांब राहा. व आपले काम करून लगेच घरी या.
शक्यतो, घरातच सुरक्षित राह आणि जर काही अडचण आलीच तर घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करा जेणेकरुन नकारात्मक वातावरनापासून लांब राहाल.
या आजाराला जास्त भयंकर आजार म्हणुन नका बघु एक साधारण आजार म्हणुन त्याला हाताळा. आणि नकारात्मक माहिती पासुन लांब राहा. रात्री झोपताना सकारात्मक विचार करा.
मी स्वस्थ असुन कृतिशील आहे, हाच विचार करून झोपा. लक्षात ठेवा आपले अवचेतन मन प्रत्येक आजाराचे निदान करू शकते. आणि आपल्या प्रत्येक आजाराचे निदान हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
म्हणुन निगेटिव्ह लोकांपासून, निगेटिव्ह विचारांपासून लांब रहा. इतका विचार कशाला करता.माणूस म्हटला तर आजारपण येणारच त्यात इतकं घाबरून जावू नये.एक दिवस प्रत्येकालाच जायचे आहे. आनंदाने जीवन जगा. देवावर श्रद्धा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. सर्व सुरळीत होईल.
स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही तंदूरस्थ,स्वस्थ आहात.
जर तुम्ही विचारात स्वस्थ असाल तर भौतिक जगात राहणारच.
जर चांगले लोकं आणि चांगले विचार तुमच्यासोबत असतील तर जगात तुमचा पराभव कोणीच करु शकणार नाही.
तर मित्रांनो , तुम्ही या लेखशी सहमत असाल तर कमेंट मध्ये yes लिहा आणि नसाल तर no लिहा. या लेखला प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहाचवणे आपली जबबदारी आहे.नकारात्मक माहिती भरपुर पसरवतात, हिम्मत असेल तर सकारात्मक विचार पसरवा. मी तुमच्यासाठी असेच सकारात्मक विचार, सकारात्मक गोष्टी, कविता घेऊन येत असतो, म्हणुन आमच्या राष्ट्रिय मराठी पेजला फॉलो करा.
धन्यवाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, pleas let me know