खुप झाल देवा आता, काहीतरी चमत्कार कर...

 

       


       आज आपण अशी एक हृदयस्पर्शी कविता एकनार आहेत, की ही कविता एकुण प्रत्येकाचे मन भरून येईल. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेची, देवाकडे केलेली ही आर्त विनवणी या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे.  

**चला तर मग या सुंदर कवितेला सुरुवात करूया.***

*खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर.. 

नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर..

*किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत..

तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत..

*माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय..

सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय..

*धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत..

मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत..

*शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या..

तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज ,हळूच कानात माझ्या..

*चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता..

शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता..

*देव म्हटला... बेटा..... खरंच थांबलय की रे सगळं..

फक्त तुला जे दिसतंय त्यापेक्षा मला दिसतंय वेगळं..

*माझ्या मंदिरातील गर्दी आज मंदिरात नाही..

 पण खरा भक्त मला फक्त मंदिरात शोधत नाही..

*जग थांबलय सारं, अस तुला का वाटतंय..

 बघ माणसासाठी, आज माणसाचंच मन आटतय..

*घासातला घास आज , माणूस माणसात वाटतोय..

खरं सांगू तुला, आज मला खरा नेवैद्य भेटतोय..

*निवांत पणे माणूस आज , एकच विचार करतोय..

कमाई तर खूप झाली, 

पण आज मी कशासाठी           

 जगतोय..

* बघ ना सगळी जात पात गेली......अन माणसं एक झाली..

 शरीराने दुरावली पण मनाने जवळ आली..

*आज खरतर माणसातला देवच शोधला माणसाने..

आणि जे मला जमलं नाही ,ते करून दाखवलं या आजाराने...

* ते खरंय देवा, 

पण माणसं भुकेने मरतील आता..

चुली तर कधीच विझल्यात, सरण रचली जातील आता..


Also Read-Best morning affirmation in marathi


*एक वचन देतो बेटा.. 

भुकेने कुणी मरणार नाही..

धान्य नसलं घरात , तरी उपासमार होणार नाही..

*थोडं कठीण वाटतंय , पण अशक्य नक्कीच नाही..

 कारण तुझ्या दानाची किंमत, कमी ठरणार नाही..

*या आजाराने माणसाला, एक नक्की शिकवलं..

सगळ्या ऐहिक सुखाला एका कोपऱ्यात जाऊन बसवलं..

*सगळं खरंय देवा , पण आता बघवत नाही रे..

तुझ्या सृष्टीची नासाडी, तुझ्याच समोर होईल रे..

*घाबरू नकोस बेटा, 

फक्त माणसं म्हणजे सृष्टी नाही..

आणि माझ्या सृष्टीची नासाडी ही कला माझ्यात नाही..     

*कळ सोस थोडी, सगळं सुरळीत होईल..

 फक्त आताची माणुसकी, जन्मभर लक्षात राहील..

* जमलं तुला तर , थोडे कष्ट करून बघ..

 कुणासाठी जमलं तर , काहीतरी करून बघ..

*एकदाच मिळालीय संधी मला गाभाऱ्याबाहेर बघण्याची..

त्यांच्याकडून शिकून घे कला दुसऱ्या साठी जगण्याची..

* देवळात नसलो तरी आज रस्त्यावर तुला अडवणारा , वर्दीत मीच आहे ...

आणि दवाखान्यात उपचार करणारा , पण मीच आहे..

*आजार काय रे....आला तसा निघून जाईल...

पण आजची माणुसकी ही जन्मभर लक्षात राहील...

*आजची माणुसकी हि जन्मभर लक्षात राहील...



मित्रांनो,,,

          हि कविता तुम्हाला कशी वाटली, तुमचे अनमोल अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आणि या व्हिडीओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा , जेणेकरुन सर्वांना ही कविता एकायला भेटेल.

    

                         धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हनुमान चालीसा मराठी अर्थासाहित.

Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore